भारतात 24 तासांमध्ये 2 हजार 685 नवे रुग्ण आढळलेत. तर 33 जणांचा मृत्यू झालाय. तर अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या देशभरात १६ हजार इतकी झालीय. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचं प्रमाण 98.75 टक्के आहे, अशी माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.
कोरोनाचे रुग्ण वाढवण्याचे प्रमाण 0.04 टक्के असल्याचं देखील आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आलेय. मागील 24 तासंमध्ये झालेल्या 3मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 572 झालीय. तर कोरोना रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा 4 कोटी 31 लाख 50 हजार 215 झालाय.
राज्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. एप्रिलपासून मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करण्यात यावा असे आवाहन करण्यात येते. आठवड्यात कोरोना संसर्गाचा रेट मुंबईत 3.17% , आणि पुण्यात 2.16 % आहे. कोरोनासंर्गाचा हा दर जास्त आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 536 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. 4 कोटी 26 लाख 9हजार 335 जण आजपर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत देशात 193 कोटी 13 लाख लसीकरणाचे डोस देण्यात आल्याची माहिती, पीआयबीने दिलीय. देशात 16 हजार 308 सक्रिय रुग्ण आहेत.