सोशल मीडियावर अनेकदा आपण आईशी संबंधित अनेक पोस्ट व्हायरल होताना पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात आई खूप जवळ असल्यामुळे अशा भावनिक पोस्ट प्रत्येकाला आवडतात. एक व्यक्ती अशीही आहे जी आईच्या बरोबरीला असते आणि ती म्हणजे आपले वडील. वास्तविक, वडिलांबद्दल सोशल मीडियावर फारशा पोस्ट नाहीत. पण त्याच्याशी संबंधित व्हिडीओ किंवा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती त्यांची सायकल चालवताना दिसत आहे. याच्या मागे शाळेचा गणवेश घातलेली त्यांची मुलगी आणि समोर मांडीवर बसलेला मुलगा दिसतो. ते शाळेत जाताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग वडील आपल्या मुलांना सायकलवर बसवून शाळेत घेऊन जाताना दिसत आहेत. हे पाहून लाखो लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
वडिलांचे मुलांवर असलेले प्रेम या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. लाखो लोकांची मनं या व्हिडीओने जिंकली आहेत. आत्तापर्यंत या व्हिडीओला सोशल मीडियावर एक लाख ५२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पिता 🙏🏻 💕 pic.twitter.com/w3buFI6BpR
— Sonal Goel IAS 🇮🇳 (@sonalgoelias) May 23, 2022