Latest Marathi News

BREAKING NEWS

 

या जिल्ह्यात ‘कचऱ्यापासून’ इंधन

0 93

 

 

लातूर : महापालिकेमार्फत सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प उभारण्या त येणार आहे. हा प्रकल्पि भारतातील पहिलाच प्रायोगिक व सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावरील प्रकल्प ठरणार आहे. महापालिकेच्या वरवंटी खत प्रकल्पास्थळी ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त अमन मित्तल यांनी मान्यता दिली. या प्रकल्पातून दिवसाला १५० ते २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

लातूर शहरातून दररोज १५० ते २०० टन कचरा वरवंटी डेपोत जातो. वेस्ट टू एनर्जी’ या नव्या प्रकल्पा अंतर्गत पहिल्या टप्प्यात या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करून इंधन तसेच चारकोल तयार केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात यापासून सुमारे दोन मेगावॉट वीज निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प येत्या सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.

वायुप्रदूषण रोखणारा प्रकल्प
या प्रकल्पातून शाश्वत पर्यावरण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पात वायू, जल, मृदा प्रदूषण रोखण्यातबाबतची उपकरणे असतील. त्यापमुळे सध्या सततच्या आगीमुळे होणारे वायु प्रदूषण रोखण्यास हा प्रकल्प फायदेशीर ठरेल. महापालिकेच्या उपायुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त मंजूषा गुरमे, कार्यकारी अभियंता विजय चव्हाण यांच्या देखरेखीखाली वरवंटी येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.