अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात सासऱ्यानेच आपल्या जावयाच्या अंगावर टेम्पो चढवत त्याला चिरडून ठार केल्याची घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीला तसेच मुलाला माहेरी पाठवत नसल्याचा राग आल्याने सासऱ्याने हे कृत्य केल्याची प्राथामिक माहिती आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कौडाणे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय जानू मुळे राहणार कौडाणे असं मृत्युमुखी पडलेल्या जावायाचं नाव आहे. तर सूद्रिक मुळे असं गुन्हा दाखल झालेल्या सासऱ्यांच नाव आहे. माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कौडणा आणि मुळेवाडी येथील सुद्रिक व मुळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. काही दिवसांपासून दत्तात्रय हा त्याच्या पत्नीना तसेच मुलाला माहेरी पाठवण्यास नकार देत होता. त्यामुळे सूद्रिक आणि मुळे यांच्यामध्ये नेहमी वादावादी होत होती.
दरम्यान, सुद्रिक हे वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमला आले होते. त्यावेळी नातंवाला घेण्याचा आग्रह धरला. मात्र मुलाला घेऊन जाण्यास यांनी विरोध केला. दत्तात्रय मुळे यांनी टेम्पोत बसलेल्या मुलांना उतरवण्यासाठी टेम्पो वर चढले त्यावेळेस त्यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर सुद्रीक यांनी जावई मुळे याच्या अंगावर टेम्पो घालून त्याला चिरडून ठार मारले. पोलिसांनी तक्रार दाखल होताच दोन आरोपींना अटक केली आहे. तर एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.