बीड : बीड शहरातील अंबिका चौक परिसरात आईने आपल्या लाडक्या मुलीचे थाटात लग्न लावले, पाणवलेल्या डोळ्यांनी तिला निरोप देत पाठवणी केली, परंतु, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आईने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (27 मे) दुपारच्या सुमारास बीड शहरातील अंबिका चौक परिसरात घडली आहे. सुवर्णा सुनील जाधव (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सुवर्णा यांच्या मुलीचा लग्नसोहळा 26 मे रोजी मोठ्या थाटात पार पडला. सायंकाळी मुलीची सासरी पाठवणी केली. त्यानंतर शुक्रवारी (27 मे) मयत सुवर्णा यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच, बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.परंतु, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.