Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सोलापुर: ‘लिंग परिवर्तन’ शस्त्रक्रिया पडली पार ; पुरूषाचे महिलेत रुपांतर!

0 770

सोलापूर : स्त्री किंवा पुरुषाचा देह घेऊन जन्म घेतला असला, तरी त्या देहातील मन विरोधी लिंगी असल्याची जाणीव झाल्यानंतर जगणेच अस्वस्थ होते. कधीकधी मुलांना आपण मुलगा असूनही मुलगी असल्याचा भास होतो. काही मुलींमध्ये पुरुषाप्रमाणे लैंगिक वर्तन दिसते, त्यांच्यात पुरुष होण्याची इच्छा अधिक असते. तर काही मुलांना आपण मुलगी असल्याचा भास होतो. अशाच प्रकारची एक लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

 

 

सोलापुरातील ऍडोरा रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वीरित्या लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉ. शरण हिरेमठ यांनी शस्त्रक्रिया ही करून दाखवली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी एका पुरुषाच महिलेमध्ये रूपांतर केले आहे. संबधित तरुणाच्या कुटुंबीयांच्या संमतीनंतर आणि मानसिकरोग तज्ञांच्या सल्ल्यानंतरच ही लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे.

 

लिंग परिवर्तन करणाऱ्या तरुणाने त्यांची ओळख गुपित ठेवली असल्याने या तरुणाबाबत अधिक माहिती मिळून शकलेली नाही. परंतु, सुरूवातीला फक्त विदेशात होणारी ही शस्त्रक्रिया आता भारतातही आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही होत असल्याने अनेक लिंग परिवर्तन करू पाहणाऱ्यांच्या अडचणींचा मार्ग सुकर झाला आहे.

 

दरम्यान, या शस्त्रक्रियेसाठी साधारण एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे. त्याचबरोबर लिंग परिवर्तनानंतर पुरूषातून महिलेमध्ये परिवर्तन झालेल्या महिलेला मुलाला जन्म देता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.