आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली असली तरी गांभीर्य मात्र राहिलेले नाही. तसेच प्रशासन ही ढिम्म असल्याचे जाणवत आहे. अजूनही बरसचे नागरिक मास्क चा वापर करताना दिसत नाहीत. आज दिनांक ०३ रोजी कोरोनाचे तब्बल २३ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.
गावनिहाय रुग्ण
निंबवडे ०१
शेटफळे ०३
करगणी ०२
वलवण ०४
गोमेवाडी ०१
आटपाडी ०५
दिघंची ०२
विठ्ठलापूर ०२
लिंगीवरे ०१
खवासपूर ( ता.सांगोला) ०१
तासगाव ०१
एकूण २३
आज आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णापैकी १५ पुरुष रुग्ण तर स्त्री रुग्ण २८ असे एकूण २३ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस