Latest Marathi News

BREAKING NEWS

 

संतापलेल्या टेलरने चक्क ग्राहकाच्या पोटातच खुसपली कात्री!

0 365

 

 

 

 

पुणे:  टेलर आणि त्याच्या ग्राहकात घडलेल्या एका घटनेने पुणे हादरुन गेले आहे. या घटनेत संतापलेल्या टेलरने चक्क ग्राहकाच्या पोटातच शिवण कामासाठी वापरली जाणारा कात्री खुपसली आहे. यात ग्राहक जखमी झाली आहे. शहरातील चंदननगर परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . टेलरिंगच्या दुकानात कपडे अल्टर करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या पोटात कात्र  खुपसली आहे. ही घटना चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत ग्राहक जखमी झाला आहे. अजय प्रभाकर पायाळ असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकाराने चंदननगर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील आनंद पार्क येथील मुज्जमील टेलर शॉप मध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुज्जमिल टेलर शॉप येथे काम करतो. पीडित तरुण व त्याचा मित्र त्यांच्याकडे पँट अल्टर करण्यासाठी दुकानात गेले . नंतर पीडित ग्राहक व आरोपी यांच्यात पैसे देण्यावरून वाद निर्माण झाला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली.

 

 

यामध्ये चिडलेल्या आरोपीने पीडित तरुणाला स्टूल फेकून मारला व रागाने कात्री त्याच्या पोटात खुपसली अशी तक्रार पीडित तरुणाने दिली आहे. या घटनेचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.