Latest Marathi News

BREAKING NEWS

 

भाजपची काळजी करू नका,स्वतःच्या पक्षाचे…; निवडणुकांवरून भाजपाने खोचक शब्दांत पवारांवर साधला निशाणा! 

0 367

 

 

महाराष्ट्र: “मी भाजपाचा पुन्हा राज्यात सत्तेत येऊ देणार नाही”, असा निर्धार शरद पवारांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेतेमंडळींना दिला होता. या मुद्द्यावरून आता भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात जोरदार उत्तर  प्रत्युतर सुरु आहे. शरद पवारांच्या याच विधानाला आता भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “तुमच्या पक्षाचे ६० पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवा”, अशा शब्दांत भाजपाने शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

“आदरणीय शरद पवार साहेब..कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला १०५ जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल”, अशा खोचक शब्दांत महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून भाजपाने शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

तसेच, “शरद पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षांत दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”, असे जोरदार आव्हान भाजपाने  शरद पवारांना दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.