आटपाडी: सकाळी पोट रिकाम राहिल्याने अनेक प्रकारचे आजार आपल्याला होतात. सकाळी रिकाम्या पोटी अनेकांना अॅसिडिटी, पोटदुखी, उलट्या आणि रक्तातील साखरेची समस्या उद्भवते. त्यामुळे बरेच लोक सकाळी भूक शांत करण्यासाठी अशा गोष्टी खातात, ज्यामुळे आणखी समस्या उद्भवू शकतात.
सकाळी रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने तब्येत बिघडू शकते. रिकाम्या पोटी मद्यपान प्यायल्याने ते तुमच्या रक्तप्रवाहात जाते. अशा परिस्थितीत ते संपूर्ण शरीरात पसरते आणि त्यातून रक्तवाहिन्या पसरतात. यामुळे आपल्या नाडीचा दर घसरण्याची शक्यता असते, त्यामुळे किडनी, फुफ्फुस, यकृताचा त्रास होऊ शकतो, म्हणून रिकाम्या पोटी मद्यपान करू नका.
तसेच, सकाळी रिकाम्या पोटी लोक कॉफी पिण्यास सुरुवात करतात. रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा प्यायल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
त्याचप्रमाणे, रिकाम्या पोटी लोकांना चिंगम चघळण्याची सवय असते. कारण रिकाम्या पोटी चिंगम चघळल्याने आपल्या पोटात पाचक ऍसिड तयार होऊ लागते. या पाचक ऍसिडमुळे रिकाम्या पोटी ऍसिडिटीपासून अल्सरपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे रिकाम्या पोटी चिंगम चिघळू नये.