Latest Marathi News

BREAKING NEWS

 

ट्विटरवर विजय मल्ल्याने होळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर नेटकऱ्यांनी धरले धारेवर “आधी पैसे परत कर, मग…”

0 226

 

 

नवी दिल्ली: भारतातून फरार असलेला कर्जबुडव्या विजय मल्ल्या कायम नेटकऱ्यांच्या धारेवर असतो. विजय मल्ल्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याने काही ट्वीट किंवा पोस्ट केली की केली, लगेचच नेटकरी त्यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत असतात. असेच एक ट्वीट चर्चेत आले आहे. यावेळी निमित्त ठरलेले आहे होळी शुभेच्छांचे. कर्जबुडव्या विजय मल्ल्याने होळीच्या शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत त्याला धारेवर धरले आहे.

 

 

विजय मल्ल्याने काल रात्री ट्वीट करत “Happy Holi to all” अशा शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्वीटखाली कमेंट्सचा लगेचच वर्षाव सुरु झाला. अनेकांनी प्रतिक्रिया देत मल्ल्याळा धारेवार धरत बुडवलेल्या पैशांबाबत विचारणा केली आहे.

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार,  केंद्र सरकारनेहि सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, विजय मल्ल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्तेतून बँकांनी १८ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. ईडीने पीएमएलए अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार बँक डिफॉल्ट प्रकरणात ही रक्कम जप्त केली आहे. या फरार व्यावसायिकांकडून घोटाळ्याची संपूर्ण रक्कम लवकरात लवकर वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.