नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. जर मुलीने तिच्या वडिलांसोबत कोणत्याहि प्रकारचे नाते ठेवले नसेल तर तिला वडिलांकडून पैसे मागण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. जर मुलांनी आपल्या वडिलांशी कोणतेही नाते ठेवले नसेल किवा ते त्यांच्या संपर्कात नसतील तर त्यांना वडिलोपार्जित संपत्तीमधून पैसा मागण्याचाही कोणताही अधिकार राहत नाही. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती किशन कौल आणि एम.एम. सुंदरेश यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर मुलीने मोठ्या कालावधीसाठी आपल्या वडिलांशी कोणत्याहि प्रकारचे नाते ठेवलेले नसेल तर तिला आपल्या वडिलांकडे पैसे मागण्याचा कोणताही अधिकार राहत नाही. या प्रकरणामध्ये महिला २० वर्षांची असताना आपला मार्ग स्वत: निवडण्यासाठी वडिलांपासून दूर गेली. त्यानंतर तिने वडिलांशी कोणताही संबंध ठेवला नाही. आता ही मुलगी पुढील शिक्षणासाठी वडिलांकडून पैशांची मागणी करत आहे.परंतु, न्यायालयाने तिला असे करता येणार नाही असा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या मुलीचे वय तिला आयुष्यामध्ये पुढील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देते असे निरिक्षनात नोंदवले आहे. परंतु, असे जरी असले तरीहि तिला याचिकाकर्त्याकडून पैसे मागता येणार नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे.
परंतु, या तरुणीची आई तिला मिळणाऱ्या भत्त्यामधून तिच्या इच्छेप्रमाणे मुलीला पैसे देऊन मदत करु शकते. घटस्फोटाच्या एका प्रकरणाशी संबंधित ही याचिका होती. यामध्ये पतीने तिच्या वैवाहिक अधिकारांनुसार न्याया द्यावा अशी याचिका दाखल केली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली होती.