Latest Marathi News

BREAKING NEWS

 

बाईकला ट्रॅक्टरचा सायलेंसर आणि नंबर प्लेटच्या जागी “बोल देना पाल साहब आये थे”; थेट जेलची हवा खावी लागली!

0 485

 

 

उत्तर प्रदेश:  दुचाकींवर कर्कश आवाजातील सायलेंसर आणि आपला थाट दाखवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट हे काही आता कोणासाठी नवीन नाही. रस्त्यावरुन प्रवास करताना अशा अनेक दुचाकी पाहायला मिळत असतात. पण उत्तर प्रदेशात तर दुचाकी चालकाने तर हद्दच पार केली आहे आणि यात विशेष म्हणजे यासाठी त्याला बिना भाड्याच्या खोलीत म्हणजेच सरळ जेलची हवा खावी लागली आहे.

 

 

मुरादगंजचे अधिकारी अविनाश कुमार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना तीन तरुण दुचाकीवरुन जाताना दिसले होते. दुचाकीवरुन तिघे प्रवास करत असल्याने त्यांना थांबवण्यात आले असता एक विलक्षण प्रकार त्यांच्या लक्षात ला. त्यांच्या दुचाकीची  नंबर प्लेट काही तरी वेगळीच होती.त्या दुचाकीच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या जागी “बोल देना पाल साहब आये थे” असे आश्चर्यकारक लिहिले होते.

 

तसेच, दुचाकीला कर्कश आवाजातील सायलेंसर लावण्यात आला होता. मूळचा सायलेंसर काढून त्या जागी ट्रॅक्टरचा सायलेंसर लावण्यात आला होता. त्याचबरोबर या तरुणांनी हेल्मेटदेखील घातलेले नव्हते. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले असल्याने या तरुणांना जेलमध्ये जावे लागले आहे. तसेच हा सगळा प्रकार पोलिसांनी ट्वीट करत सांगितला आहे. अटक करण्यात आलेल्या या तरुणांची नावे अंकित पाल, शिवम पाल आणि अमर पाल अशी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.