महाराष्ट्र: भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दरेकर यांना त्वरित दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिल्यावर दरेकर यांनी सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यासंबंधित दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने दरेकर यांना दिलासा दिला असून त्यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.