नवी दिल्ली: रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरहिच्या मृत्यूमुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला आहे. २३ वर्षीय ग्रेटा गेल्या वर्षभरापासून गायब होती, परंतु, ती सोशल मीडियावर दिसत दिसत होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना तिने ‘मनोरुग्ण’ असे म्हणून संबोधले होते. तेव्हापासून ती जोरदार चर्चेत आली होती.
एका आंतरराष्ट्रीय इन्टरनेट वाहिनीच्या वृत्तानुसार, ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविनने केली होती. कोरोविनने ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून कारच्या ट्रकमध्ये टाकला होता. आता कोरोविनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि असे म्हटले आहे की, त्याने ग्रेटाला ३०० मैल दूर रशियाच्या लिपेटस्क येथे नेले होते. त्या ठिकाणी त्याने ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला आणि कारच्या ट्रकमध्ये असाच सोडून दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय वक्तव्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. कोरोविनने सांगितले की, तो तीन रात्री हॉटेलच्या खोलीत ग्रेटाच्या मृतदेहासोबत झोपला होता.