महाराष्ट्र: दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहराच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना अटक केले आहे. या अटकेला सूचना देणारी याचिका न्यायालयाने नाकारली आहे. असे चालू असताना आता नवाब मलिक यांची जामिनावर सुटका हवी असेल तर बिटकॉईनच्या माध्यमातून तीन कोटी रुपये द्या, अशी मागणी करणारा एक मेल मलिक यांचा मुलगा आमिर मलिक यांना आला आहे. या मेलनंतर आमिर मलिक यांनी पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
एका इन्टरनेट वाहिनीच्या वृतानुसार, नवाब मलिक यांचा मुलगा आमिर मलिक यांना एक निनावी मेल आला आहे. या मेलमध्ये नवाब मलिक यांची जामिनावर सुटका हवी असल्यास तीन कोटी रुपये बिटकॉईनच्या माध्यमातून देण्याची मागणी करण्यात आली आहे. “मला आलेल्या मेलबाबत मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.परंतु ही गोपनीय गोष्ट असल्यामुळे मी अधिक माहिती देऊ शकत नाही,” असे आमीर यांनी म्हटले आहे.