व्यक्तीला मोकळ्या गार्डनमध्ये, शहराच्या बाहेर किंवा मग नॅशनल पार्कमध्ये जाऊन खेळण्याची बसण्याची आवड असते. तेच, अनेक लोक जंगल किंवा नॅशनल पार्क जवळ राहतात. त्यांच्या आवारात वाघ, बिबट्या अशा प्राणी येऊन लहान मुलांना पळवून लावतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायरल झाला आहे.
या व्हीडीओमध्ये वडिलांसोबत बागेत खेळायला हा लहान मुलगा आलेला असतो. पण वडिलांची वडिलांची नजर हटताच एका गरुडाने त्याच्यावर हल्ला केला आहे. मुलाला घेऊन हा पक्षी जमिनीपासून आकाशात उंच भरारी घ्यायला जातो. तो आकाशात उंच जाणार तेव्हाच मुलाच्या वडिलांची त्याच्यावर लक्ष जाते आणि ते पक्ष्याच्या तावडीतून आपल्या मुलाला सोडवण्यासाठी त्याच्या मागे धावतात .
https://www.instagram.com/p/CbFEqlGlu4A/?utm_source=ig_embed&ig_rid=96918df7-1942-48c3-8578-19c3d82cde46
हे पाहिल्यानंतर पक्षीही घाबरतो आणि तो त्या मुलाला सोडून जातो. जसा तो मुलाला सोडतो तसा मुलगा जमिनीवर पडतो. पण अंतर फार नसल्याने मुलाला काही होत नाही. त्याचे वडील त्याच्याजवळ जातात आणि त्याला आपल्या कुशीत घेतात.