Latest Marathi News

BREAKING NEWS

 

पीएचडी प्रवेशासाठीच्या नियम, अटींमध्ये बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती

0 237

 

 

 

विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडीच्या प्रवेशासाठीच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. सध्या असलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) व्यतिरिक्त, पीएचडी प्रवेशसाठी प्रवेश परीक्षा समाविष्ट करण्याचा महत्वाचा निर्णय युजीसीने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंडरग्रॅजुएट पदवीमध्ये 7.5 चा किमान CGPA असलेला पदवीधारक देखील आता पीएचडी प्रवेशासाठी पात्र असणार आहे.

 

 

तसेच, UGC ने रेग्युलेशन ऍक्ट 2016 च्या नवीन मसुद्यातील सुधारणांमध्ये, उपलब्ध जागांपैकी 60% जागा नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट /ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी राखीव ठेवण्याचाही प्रस्ताव दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेएक मोठे पाऊल उचलले असून, यावर्षीपासून एमफिल पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच यूजीसी रेग्युलेशन 2022 अंतर्गत इतरही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आता शिक्षक, प्राध्यापकांना सेवानिवृत्तीनंतरही पुन्हा आपल्या विद्यापीठात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.