Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सामाजिक रूढींची परिसीमा ओलांडणारा “हा” चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार ……

0 213

 

 

 

मुंबई : समाज कितीही पुढारलेला असला तरी त्याची स्त्री प्रतीची भावना मात्र सारखीच आहे. पुरोगामी होत असताना आधुनिक जगतात वावरत असताना स्त्री ला तिच्या हक्कासाठी तिच्या स्वातंत्र्यासाठी लढावे लागते. असाच एक लढा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे ‘रिवणावायली या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

 

 

रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळे; एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळे होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते. ‘बिटरस्वीट’ या चित्रपटासाठी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पारितोषिक विजेती अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

 

 

उच्च शिक्षण घेऊन आपले स्वतःचा जगात एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी जटणाऱ्या ‘ऐश्वर्या देसाई’ या बंडखोर मुलीची ही कथा आहे येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जुन्या रूढी परंपरा आणि लग्नाच्या बेडीत स्त्रिया अडकून जातात, अनेकदा इच्छा असून सुद्धा त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वागता येत नाही.हे सगळे घडत असतानाच अनेकदा आपल्या आयुष्यभराचा सोबती असलेला आपला जोडीदाराकडून स्वतःची होणारी मुस्कटदाबी ही स्त्रीच्या अंतःकरणातला आक्रोश बाहेर आणते. याचेच बंडखोर चित्रण या ‘रिवणावायली’ मध्ये चित्रित करण्यात आले आहे.

 

 

या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.