आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे रुग्ण वाढू लागल्याने कालपासून आटपाडी तालुक्यात सकाळी ८ ते सायंकाळी ८ अशी दुकाने उघडण्याची वेळी करण्यात आली आहे. तर शासनाने ही आठवड्यातील शनिवार व रविवारी पूर्णतः लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही प्रमाणात कोरोना साखळीचा संसर्ग तुटण्याची शक्यता आहे. परंतु नागरिकांची मात्र शासनाने दिलेले आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०४ रोजी कोरोनाचे तब्बल १९ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.
गावनिहाय रुग्ण
दिघंची ०१
वलवण ०१
करगणी ०३
आटपाडी ०२
पाचेगाव (सांगोला) ०१
आवटेवाडी ०१
माळेवाडी ०१
आंबेवाडी ०१
गळवेवाडी ०३
हिंगणी (माण सातारा) ०१
खवासपूर ( ता.सांगोला) ०१
तासगाव ०१
एकूण १९
आज आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णापैकी ११ पुरुष रुग्ण तर स्त्री रुग्ण ०८ असे एकूण १९ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस