आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सध्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ सुरु असून यामध्ये तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहे. या १० ग्रामपंचायत पैकी पात्रेवाडी ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली असून ०७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सध्या नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी उमेदवार नसल्याने ह्या ०२ जागा रिक्त राहिलेल्या आहेत.
तर बोंबेवाडी ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध होण्याच्या मार्गावर होती. परंतु एक सदस्य अर्ज माघारी घेण्याच्या वेळेत हजर राहू न शकल्याने त्या ठिकाण निवडणूक लागली आहे. तर गावकऱ्यांनी एकमेकाशी चर्चा करत व गावाच्या विकासाला चालना देत ०६ सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य
सुधीर संपतराव विभूते
माणिक भिमराव खरात
अंजना पांडुरंग जेडगे
प्रियांका दत्तात्रय मोटे
अलका शंकर करांडे
रुपाली अरविंद करांडे
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे सर्वपक्षीय असून गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. तर राहिलेल्या एका जागेसाठी ही सर्व गावकरी एकत्र येत सर्वानुमते एक उमेदवार निवडून आणणार असल्याचे बोंबेवाडीचे माजी सरपंच दादासाहेब मोटे म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
