आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ०५ नवे रुग्ण तालुक्यात सापडले आहेत. तर आजचे सर्व रुग्ण हे आटपाडी शहरातील असल्याने शहरवासीयांची चिंता वाढली असली तरी अजूनही नागरिकांना कोरोनाची कसलीच भीती वाटत नसल्याचे चित्र दिसत असून फक्त पोलीस दिसले कि नागरिक आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधत आहेत.
गावनिहाय रुग्ण संख्या
आटपाडी ०५
एकूण ०५
आज आलेल्या नवीन कोरोना रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०४ तर महिला रुग्ण ०१ असे एकूण ०५ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस